Friday, January 25, 2008

चीज..

अस्‍ताई
तुम्‍हरे बिन कछु सूझत नांहि
भई दीवानी मीरा जैसी ।
तरपत हूं दिन रात मैं प्‍यासी
घायल जलबिन मछली सी।।
अंतरा
कब आओगे मोरी अटरिया
सकल सुहावन सांवरिया ।
बिनती करत मनवा बांवरिया
आवो बेगिन म्‍हारो पिया।।

Me n You..

The only road goes to you,
laced with the flowers of dreams and passions..

The only mound of ego,
I cannot overcome, between me and you..

The only wave of anger, I cannot ride,
breaks on the banks of you..

The only river of grudges and prejudices,
I cannot bridge, between me and you..

The only ray of hope, leads me to you,
whice travels through the clouds of untrust..

The only silken string of eternal love,
binds me to you....

Saturday, January 19, 2008

मृगजळ....

कवायत करताना,
एका सैनिकाचा चुकला ठेका,
कारण त्‍याला ऐकू येत होते,
अज्ञाताचे पडघम....
माझेही तसेच झाले..
इंद्रधनुषी कमानीवर बसलेल्‍या,
सोनेरी पाखरामागे धावत सुटले,
अन्‌ फशी पडले; पदरी आलं..
पाय पोळत वाळवंट तुडवणं,
काया जाळत क्षितिज गाठणं,
माथ्‍यावर ऊन, पायांतळी रण,
घायाळ तन, घायाळ मन..
कारण, ते होते मृगजळ,
खोटे,फसवे केवळ......

Wednesday, January 09, 2008

मी अशी..

मी अशी नि:स्‍तब्‍ध उभी,
एकेक पान गळताना,
हिरवी पाने पाचोळा होऊन,
वार्‍यासंगे भिरभिरताना..
पानांचा हिरवा पानोरा,
स्‍मृतिपुष्‍पांचा नवलफुलोरा,
रसभरल्‍या,टप्‍पोर फळांचा,
सडा अनावर ओघळताना..
बालपणीची अल्‍लड नाती,
तारुण्‍यातील अवखळ प्रीती,
आजवर जोपासलेल्‍या हिरवाईची,
एकेक नाळ तुटताना..
भावबंध अन्‌ नाती सरती,
तुटू पाहती रेशीमगाठी,
घट्‍ट माती परि मुळांभोवती,
सख्‍या तुझ्‍याप्रती,येऊ देइना..

Sunday, January 06, 2008

सूर्या...

एक बरं केलस,
झोप उडवून टाकलीस,
स्‍वप्‍नांचा सोपान तुटला..

आता अर्धमिटल्‍या डोळ्‍यांना,
स्‍वच्‍छ दिसू लागलाय वर्तमान..

गुलाबी,केशरी रंग घेऊन,
अवतरलास तू प्राचीवर,
अन्‌ मनातले निळे-करडे भाव सारे,
पळून गेले क्षितिजापार...

आता सारी वाट झालीय प्रकाशमान..
नवी क्षितिजे झालीय्‌त दृश्‍यमान..
उघडलीय इंद्रधनूची उज्‍ज्‍वल कमान..

आता दूर कर सार्‍या व्‍यथा-वेदना..
अन्‌ कर विश्‍वाचे कल्‍याण......