पाचोळा
निवांत रात्री, जागणारा चंद्र,
आणि जोडीला त्याचं चांदणं,
हरवलेली मी मात्र,
मनातल्या सावल्यांच्या साक्षीनं.....
वाराही माझ्या थार्याला नाही,
चित्त आज माझे थार्यावर नाही,
माझ्या मनाच्या वळचणीला
आज एकही पाखरु नाही......
पाखराच्या नावावरुन आठवतोय
माझा बालपणीचा गाव,
आयुष्याच्या वावटळीत हरवलेलं,
माझ्या गावाचं नाव......
नावात काय आहे रे,
कोणी काहीही ठेवतोय..
माझ्या नावाचाही,
आज ठाव हरवतोय.......
आणि जोडीला त्याचं चांदणं,
हरवलेली मी मात्र,
मनातल्या सावल्यांच्या साक्षीनं.....
वाराही माझ्या थार्याला नाही,
चित्त आज माझे थार्यावर नाही,
माझ्या मनाच्या वळचणीला
आज एकही पाखरु नाही......
पाखराच्या नावावरुन आठवतोय
माझा बालपणीचा गाव,
आयुष्याच्या वावटळीत हरवलेलं,
माझ्या गावाचं नाव......
नावात काय आहे रे,
कोणी काहीही ठेवतोय..
माझ्या नावाचाही,
आज ठाव हरवतोय.......
0 Comments:
Post a Comment
<< Home