पाचोळा
तू सांगितल्यावेळीच,अचूक पाउल टाकलं रंगभूमीवर..
रंगवत गेले वाट्याला आलेले सारे,हातात तो तो ब्रश घेउन..
त्या प्रत्येक वेळी,न विसरता उच्चारत गेले,तू पढवलेले संवाद सारे..
सभागृहाचे रंजन केले,अभिनय केले,
कुडीला जमतील ते सारे,खूप आतून,उत्कटतेने..
आता,एक्झिटही तूच ठरवलेली..
पण,एकच उत्सुकता आहे,
तू एखादी तरी पसंतीची टाळी वाजवशील का रे??

0 Comments:
Post a Comment
<< Home