सारे काही....
कधी चालताना वाट काटे घुसले पायात,
हाय चटके पायाला,मध्यान्हीच्या तडाख्यात..
काट्या-चटक्यांची तमा कधी बाळगली आहे?
भोगायाचे सारे काही माझे भोगून झाले आहे.....
फुलझेले खुडताना नाग डसले मागून,
ताराफुले वेचताना गेले पंखही जळून..
परि, उडण्याची आस कुठे भंगलेली आहे?
भोगायाचे सारे काही माझे भोगून झाले आहे.....
मृत्युदेवता येऊ दे माझ्या समोर साक्षात,
सात पाउली करीन सात लोक पादाक्रांत..
भार खांद्यावरी तिच्या सुखेनैव दिला आहे,
भोगण्याचे सारे काही माझे भोगून झाले आहे.....
निळ्या आसमंती घुमे शांत सागराची गाज,
जणू,स्वागत कराया श्रीहरीचे अलगुज..
श्याममेघ करुणेचा शिरी बरसत आहे,
भोगायाचे सारे काही माझे भोगून झाले आहे......

0 Comments:
Post a Comment
<< Home