Tuesday, April 24, 2007

अमल....

निळे आकाश वरती,
निळा सागर खालती,
अशा विशाल शिंपेत,
एक प्रगटला मोती....

उगवत्‍या रविकरें,
झाले आभाळ निरभ्र,
पसरली आभा शुभ्र,
मंगलाची,पवित्रतेची....

एका स्‍मिताच्‍या रेषेने,
पट पांगले तमाचे,
पृथ्‍वीवरी पसरले,
दिव्‍य तेज अमलाचे......

1 Comments:

Blogger कोहम said...

सुंदर. आकाश आणि समुद्राला शिंपल्याची उपमा अप्रतीम.

2:22 AM  

Post a Comment

<< Home