आठवण..ओली.
मावळतीच्या रंगात न्हायलेली,
एक आठवण ओली...
गावच्या पाउलवाटेवर,
जोडीने चालणार्या दोन सायकली....
वाटेच्या कडेला,
झाडात गुंतलेल्या आकाशवेली,
अन् भांबावलेली नजर,
एकमेकीत गुरफटलेली....
नजरेनेच वचने किती,
दिली..घेतलेली....
घामेजलेल्या तळव्यावर,
इवली रानफुले ओली.....
.....
काळाची वाजे टाळी,
वाट झालीसे निराळी..
सांज मावळली..
सारी स्वप्नेही निमाली....
बिखरली वाट,
सरेना पायातळी...
जुन्या चंदनी पेटीत,
रानफुले सुकलेली....
विसरली वाट,
पापणी ओली ओली..
आता दूरस्थ जगाची,
ओढ लागली,लागली........
एक आठवण ओली...
गावच्या पाउलवाटेवर,
जोडीने चालणार्या दोन सायकली....
वाटेच्या कडेला,
झाडात गुंतलेल्या आकाशवेली,
अन् भांबावलेली नजर,
एकमेकीत गुरफटलेली....
नजरेनेच वचने किती,
दिली..घेतलेली....
घामेजलेल्या तळव्यावर,
इवली रानफुले ओली.....
.....
काळाची वाजे टाळी,
वाट झालीसे निराळी..
सांज मावळली..
सारी स्वप्नेही निमाली....
बिखरली वाट,
सरेना पायातळी...
जुन्या चंदनी पेटीत,
रानफुले सुकलेली....
विसरली वाट,
पापणी ओली ओली..
आता दूरस्थ जगाची,
ओढ लागली,लागली........
0 Comments:
Post a Comment
<< Home