पाचोळा
उतरणीवरचा सूर्य क्षितिजाआड झेपावला,
कमलिनीच्या मिठीमध्ये भुंगा गुरफटला...
सोड सोड कमलिनी,जाऊ दे ना मला,
भुंग्याचा गुंजारव मिठीतच विरला...
सुप्रभाती पूर्व दिशा केशराने माखली,
क्षितिजावर रविराजाची स्वारी उगवली...
रविकराच्या स्पर्शाने कमलिनी मोहरली,
पाकळी नि पाकळी आनंदाने उमलली...
कमलिनीच्या मिठीतून भुंगा अलगद सुटला,
झोपेतून जागला,तो गुणगुणायलाच लागला...
अमृताच्या गोडव्याने झालो वेडापिसा,
कमलिनीच्या मिठीतून सुटलो कसाबसा...
भुंग्याची गुणगुण कमलिनीच्या कानी गेली,
रातीचे स्वप्न, ती पुन्हा आठवू लागली...
कोण आला,कोण गेला,तिच्या नाही गावी,
कमलिनीच्या मनी-मानसी राज्य करी रवी...
कमलिनीच्या मिठीमध्ये भुंगा गुरफटला...
सोड सोड कमलिनी,जाऊ दे ना मला,
भुंग्याचा गुंजारव मिठीतच विरला...
सुप्रभाती पूर्व दिशा केशराने माखली,
क्षितिजावर रविराजाची स्वारी उगवली...
रविकराच्या स्पर्शाने कमलिनी मोहरली,
पाकळी नि पाकळी आनंदाने उमलली...
कमलिनीच्या मिठीतून भुंगा अलगद सुटला,
झोपेतून जागला,तो गुणगुणायलाच लागला...
अमृताच्या गोडव्याने झालो वेडापिसा,
कमलिनीच्या मिठीतून सुटलो कसाबसा...
भुंग्याची गुणगुण कमलिनीच्या कानी गेली,
रातीचे स्वप्न, ती पुन्हा आठवू लागली...
कोण आला,कोण गेला,तिच्या नाही गावी,
कमलिनीच्या मनी-मानसी राज्य करी रवी...
0 Comments:
Post a Comment
<< Home