मीच मी...
माझ्या श्वासाच्या लयीत
वारे वाहती सर्वत्र,
नजरेच्या इशार्याने,
होई दिवस वा रात्र.
मन उचंबळुनी येता,
येती पावसाच्या सरी,
मीच या पृथ्वीवरी राज्य करी,
अधिराज्य करी.....
सुख झंकारता मनी
नवे धुमारे फुटती,
ओल्या मातीतून नव्या
इच्छा,आशा अंकुरती.
तृप्त हुंकाराने माझ्या,
नादे कृष्णाची बासरी.
मीच या पृथ्वीवरी राज्य करी,
अधिराज्य करी.....
वारे वाहती सर्वत्र,
नजरेच्या इशार्याने,
होई दिवस वा रात्र.
मन उचंबळुनी येता,
येती पावसाच्या सरी,
मीच या पृथ्वीवरी राज्य करी,
अधिराज्य करी.....
सुख झंकारता मनी
नवे धुमारे फुटती,
ओल्या मातीतून नव्या
इच्छा,आशा अंकुरती.
तृप्त हुंकाराने माझ्या,
नादे कृष्णाची बासरी.
मीच या पृथ्वीवरी राज्य करी,
अधिराज्य करी.....
0 Comments:
Post a Comment
<< Home