विराणी
ओढ लागलीसे
तुझ्या सगुण रुपाची,
क्षुद्र मी अज्ञानी,
निर्गुणी.........
तुझ्या सगुण रुपाची
अशी मोहिनी मानसी,
चित्त अहर्निशी,
तुझे ठायी.........
चित्त अहर्निशी
तुझ्यालागी झुरे,
किती येरझारे,
जन्मोजन्मी..........
जन्मजन्मांतरी
तुझ्या भेटीची असोशी,
कासया श्रीहरी
कासाविशी..........
कसा रे श्रीहरी,
जीव झालासे मंथर,
एका श्वासाचे अंतर
का न मिटे??.........
न मिटे हा जीव,
न मिटे यातना,
का न ये करुणा
तुजलागी??...........
तुजलागी आण
माझिया जिवाची,
सोडवी मायेची
निरगाठ............
तन मन धन,
तुजवरी उधळोनी,
झाले मी उन्मनी
विरहिणी............
तुझ्या सगुण रुपाची,
क्षुद्र मी अज्ञानी,
निर्गुणी.........
तुझ्या सगुण रुपाची
अशी मोहिनी मानसी,
चित्त अहर्निशी,
तुझे ठायी.........
चित्त अहर्निशी
तुझ्यालागी झुरे,
किती येरझारे,
जन्मोजन्मी..........
जन्मजन्मांतरी
तुझ्या भेटीची असोशी,
कासया श्रीहरी
कासाविशी..........
कसा रे श्रीहरी,
जीव झालासे मंथर,
एका श्वासाचे अंतर
का न मिटे??.........
न मिटे हा जीव,
न मिटे यातना,
का न ये करुणा
तुजलागी??...........
तुजलागी आण
माझिया जिवाची,
सोडवी मायेची
निरगाठ............
तन मन धन,
तुजवरी उधळोनी,
झाले मी उन्मनी
विरहिणी............
0 Comments:
Post a Comment
<< Home