Wednesday, January 09, 2008

मी अशी..

मी अशी नि:स्‍तब्‍ध उभी,
एकेक पान गळताना,
हिरवी पाने पाचोळा होऊन,
वार्‍यासंगे भिरभिरताना..
पानांचा हिरवा पानोरा,
स्‍मृतिपुष्‍पांचा नवलफुलोरा,
रसभरल्‍या,टप्‍पोर फळांचा,
सडा अनावर ओघळताना..
बालपणीची अल्‍लड नाती,
तारुण्‍यातील अवखळ प्रीती,
आजवर जोपासलेल्‍या हिरवाईची,
एकेक नाळ तुटताना..
भावबंध अन्‌ नाती सरती,
तुटू पाहती रेशीमगाठी,
घट्‍ट माती परि मुळांभोवती,
सख्‍या तुझ्‍याप्रती,येऊ देइना..

3 Comments:

Blogger Asha Joglekar said...

सुंदर !

6:45 AM  
Blogger sushama said...

thanks aasha..

2:56 AM  
Blogger sunil said...

Ashich rahude mulabhovatichi mati..
sakhyala matra sodu naka varyavarti..........

4:18 AM  

Post a Comment

<< Home