Monday, July 21, 2008

सख्‍या...

जाहले, जे घडुनी गेले, त्‍यां आठवणे व्‍यर्थ आहे,
चक्र काळाचे पुन्‍हां उलटे फिरविणे, शक्‍य का रे?

मांडलेला डाव, जो उधळून दिधला तू स्‍वहस्‍तें,
त्‍यातली रंगत फिरूनी आणणे तुज शक्‍य का रे?

बांधुनी, कवटाळुनी, जखडून ठेविशी जरि अता रे,
उडुनी गेले कापरासम, रंग नात्‍यातील सारे..

वाळल्‍या कुसुमात शोधिशी रंग बरवा तू अता रे,
रंगही ना, गंधही ना, गळुनी पडले भूवरी रे....

1 Comments:

Blogger आशा जोगळेकर said...

सुंदर. याच अर्थाची मराठी गझल माज्या ब््लॉगवर वाचता येईल.

7:30 PM  

Post a Comment

<< Home