पाऊस...
वार्याचा धिंगाणा,
पाऊस हमामा,
सांवळ्या ढगांशी,
बिजलीचा झिम्मा..
झरते पागोळ,
उखणली माती,
गारांची रांगोळी,
तुळशीभोवती..
विखरली फुले,
पारिजाताखाली,
देठांची ग लाली,
मातीत सांडली..
नदीला येतसे,
पूर अनावर,
सागरभेटीचं
डोळ्यांत सपान..
वारा हा भरारा,
उडे सैरावैरा,
पाचोळा गोलात,
फिरे गरागरा..
प्रवाहा संगती,
कागदाच्या बोटी,
घेऊन लेकींना,
निघाल्या माहेरा....
पाऊस हमामा,
सांवळ्या ढगांशी,
बिजलीचा झिम्मा..
झरते पागोळ,
उखणली माती,
गारांची रांगोळी,
तुळशीभोवती..
विखरली फुले,
पारिजाताखाली,
देठांची ग लाली,
मातीत सांडली..
नदीला येतसे,
पूर अनावर,
सागरभेटीचं
डोळ्यांत सपान..
वारा हा भरारा,
उडे सैरावैरा,
पाचोळा गोलात,
फिरे गरागरा..
प्रवाहा संगती,
कागदाच्या बोटी,
घेऊन लेकींना,
निघाल्या माहेरा....
0 Comments:
Post a Comment
<< Home