प्रवाहो...
आयुष्या कडून,
मृत्यूच्या दिशेने,
जनांचा प्रवाहो,
चाललासे..
जड,सुखी,दु:खी,
शरीराचे ओझे,
पाठीवरी येथे,
प्रत्येकाच्या..
श्रांत,क्लांत पदीं,
चालतात वाट,
आयुष्याचा मोह,
सुटेचि ना..
खरे तेज शांती,
मृत्यूचिया पार,
चिरंतन सत्य,
कळेचि ना..
उत्कंठा तेजाची,
जिवाच्या मुक्तीची,
आस चिरंतन,
मिटेचि ना..
पायांखाली वाट,
खाचा-खळग्यांची,
किती,किती चालू?
सरेचि ना....
मृत्यूच्या दिशेने,
जनांचा प्रवाहो,
चाललासे..
जड,सुखी,दु:खी,
शरीराचे ओझे,
पाठीवरी येथे,
प्रत्येकाच्या..
श्रांत,क्लांत पदीं,
चालतात वाट,
आयुष्याचा मोह,
सुटेचि ना..
खरे तेज शांती,
मृत्यूचिया पार,
चिरंतन सत्य,
कळेचि ना..
उत्कंठा तेजाची,
जिवाच्या मुक्तीची,
आस चिरंतन,
मिटेचि ना..
पायांखाली वाट,
खाचा-खळग्यांची,
किती,किती चालू?
सरेचि ना....
3 Comments:
आकाशाच्या परे काय आहे ते आता मनुष्यप्राण्याला कळलं आहे, आधी तेही मृत्युसारखंच अगम्यं असणार...
एक दिवस असा येइल की मृत्युच्या परे काय आहे तेही माणूस शोधून काढेल बहुतेक...
earlier they ued to say SKY IS THE LIMIT...but eventually horizon has expanded...god knows wat we have in share few years down the lane...
sonal madam chya matashi me sahamat nahi,
nisargala challenge nahi,
test tube baby banawalit, no doubt abt that,pan ti kasha pasun banwali? we all knows.sushama bai shi me sahamat aahe.dimakhdar varnan aahe he aayshyache.
Post a Comment
<< Home