Wednesday, August 20, 2008

सख्‍या...

अशी चालले मी, किती चालले,
किती दु:ख नेत्रांतुनी वाहिले,
किती श्रान्‍त, भेगाळली पाउले रे,
अजूनी किती चालणे राहिले..?

धरोनी तुझा हात हाती सख्‍या रे,
जणू पुष्‍पशय्‍येवरी चालले,
अचानक परि, स्‍वप्‍न ते भंगले अन्‌,
वाट्‍यास आले जिणे एकले..

संगीत ते नर्म ओठातले अन्‌,
ते भाव डोळ्‍यातले कोवळे,
किती मी स्‍मरू, अन्‌ कसे विस्‍मरू,
सख्‍या चित्र जे अंतरी कोरले..?

तिथे, पार त्‍या, दूर क्षितिजावरी रे,
नभांगण जिथे भूवरी वाकले,
तिथे नीलछायेतळी थांब प्रीतम,
निळे स्‍वप्‍न नेत्रांत सांभाळिले....

2 Comments:

Blogger आशा जोगळेकर said...

सुंदर फारच छान.
सुषमा आम्ही कांही जणांनी एक साखळी हायकू चा खेळ मांडला आहे असं वाटलं कि तुला ही आवडेल. तर आता पर्यंत ची साखळी माझ्या ब्लॉग वर मिळेळ त्या पुढील ३ ओळा तू लिहायच्या .

1:40 PM  
Blogger sunil said...

aathawtat mala tuzya dolyatil ti aasave....
kasa g visarel me suddha tula........
mazyahi matat korala aahe ek kopara.....

11:50 AM  

Post a Comment

<< Home