सख्या...
आपली, आपली म्हणताना,
माणसे दुरावत गेली,
आली, आली म्हणताना,
सांज ढळत गेली..
बघता-बघता मातीची,
नाळ तुटत गेली,
घट्ट धरलेल्या हातातून,
बोटे सुटत गेली..
न कळलेली, नात्यांची,
कोडी सुटत गेली,
वरवरची, चमकदार,
बेगड उडत गेली..
तुझी वाट पाहता-पाहता,
पापणी शिणत गेली,
सारा अंधार दाटताना,
आशाही मावळत गेली....
माणसे दुरावत गेली,
आली, आली म्हणताना,
सांज ढळत गेली..
बघता-बघता मातीची,
नाळ तुटत गेली,
घट्ट धरलेल्या हातातून,
बोटे सुटत गेली..
न कळलेली, नात्यांची,
कोडी सुटत गेली,
वरवरची, चमकदार,
बेगड उडत गेली..
तुझी वाट पाहता-पाहता,
पापणी शिणत गेली,
सारा अंधार दाटताना,
आशाही मावळत गेली....
1 Comments:
सुषमा, खूप दिवसानी आले तुझ्या ब्लॉग वर अन् खूप सुरेख कविता वाचायला मिळाली .पण एव्हढी उदासी कां ?
Post a Comment
<< Home