Sunday, February 28, 2010

पाऊस...

तु आणि मी..

भिजत होतो दोघेही..

पण तुझा पाऊस वेगळा होता,

नि माझाही पाऊस वेगळाच ....



पाऊस झरताना माझ्या देहातून

नाना सुरावटी उलगडत होत्या...


अन तुझ्या कोटा वरुन,

पाऊस तसाच कोरडा,

झरून जात होता....

तुला न भिजवता......

0 Comments:

Post a Comment

<< Home