जनात-मनात
ढग आभाळात,
धारा धरणीवर,
पाउस मनात....
थेंबांची नक्षी,
पाना-पानात,
रांगोळी मनात....
नाचतो मोर,
राना-वनात
माझ्याही मनात....
इंद्रधनूची,
रंगीत कमान,
देहा-मनात....
प्राजक्तासारखी,
शब्दांची पखरण,
मनातल्या मनात....
अळीमिळी,
गुपचिळी,
बाहेर जनात......
धारा धरणीवर,
पाउस मनात....
थेंबांची नक्षी,
पाना-पानात,
रांगोळी मनात....
नाचतो मोर,
राना-वनात
माझ्याही मनात....
इंद्रधनूची,
रंगीत कमान,
देहा-मनात....
प्राजक्तासारखी,
शब्दांची पखरण,
मनातल्या मनात....
अळीमिळी,
गुपचिळी,
बाहेर जनात......