Thursday, November 23, 2006

अंगाई

माझ्‍या ग अंगणात,
इंद्रधनूची कमान,
छान कोवळं सपान,
सोनियाचं....

अशा सोपानावरुन,
आला एक देवदूत,
काय नाव देता मला?
पुसतसे....

त्‍याच्‍या लाडक्‍या आईने,
काही योजिले मनात,
नाव सांगेल कानात,
सोनुल्‍याच्‍या....

अशा गोड सोहळ्‍याला,
आपणही यावे,
शुभ आशीर्वाद द्‍यावे,
तान्‍हुल्‍याला.......