विराणी
कडे-कपारीमधुनी,
उधाणून धावे पाणी,
समुद्रालागोनी
भेटावया....
संसार सांडोनी,
भटकते रानीवनी,
घायाळ विरहिणी,
हरिची मी....
साद घालितसे,
हरि,तुझी रे बासरी,
कधी उराउरी,
भेटशील....
तुझ्या बासरीच्या नादे,
किती घडती उत्पात,
तुटती तटातट,
भवपाश........
उधाणून धावे पाणी,
समुद्रालागोनी
भेटावया....
संसार सांडोनी,
भटकते रानीवनी,
घायाळ विरहिणी,
हरिची मी....
साद घालितसे,
हरि,तुझी रे बासरी,
कधी उराउरी,
भेटशील....
तुझ्या बासरीच्या नादे,
किती घडती उत्पात,
तुटती तटातट,
भवपाश........