Wednesday, December 12, 2007

सख्‍या...

बालपण,तारुण्‍य,उतारवय,
सगळ्‍याच पायर्‍या निसरड्‍या..
शत्रू, मित्र, रक्‍ताची नाती,
सगळ्‍याच जणू पायातल्‍या बेड्‍या..
संसार,शिक्षण,करियर,
सगळ्‍याच अंधारातल्‍या उड्‍या..
भोळी स्‍वप्‍नं, खुळ्‍या शपथा,
किती आशा वेड्‍या..
कशा रे सावरायच्‍या,
आयुष्‍याच्‍या विस्‍कटलेल्‍या घड्‍या?..
कुठवर सोसायच्‍या,
क्रूर काळाच्‍या खोड्‍या?....
जाऊ दे,चल....
जरासे हसू या गड्‍या....