Tuesday, September 25, 2007

पाचोळा....

पुलाखालून धो-धो पाणी वाहून गेलं,
तरीही नदी वाहतेच आहे,दुथडी भरून,
डोळ्‍यांमधून अलोट अश्रू वाहून गेले,
तरीही हसू फुटतंय अजून,आतून,कुठून?

ठेच..

पाउलवाट नेहमीची,
पायाखालची,सवयीची,
तरीही आज ठेच लागली,
आठवण आली का कुणाची?...

Thursday, September 06, 2007

श्रावण...

पुन्‍हां एकदा ढगांना येतो प्रेमाचा उमाळा,
सृष्‍टीच्‍या अंगावर हिरवाईच्‍या नाना कळा....

पर्वतशिखरांना लागतो ढगांचा लळा,
कभिन्‍न कातळही होतो लेकुरवाळा....

श्रावणसरींच्‍या अगणित मुक्‍तामाळा,
लहरतो,शहारतो आनंदाचा मळा....

मोहरलेल्‍या मनाला स्‍वप्‍नांचा चाळा,
मनामध्‍ये घुमतो कृष्‍णाचा घुंगुरवाळा....