हिरा आणि कोंदण...
हे केवळ म्हणायलाच बरे,
की हिर्याला कोंदण, तोलामोलाचे, वगैरे..
हिरे, जास्तीत जास्त पैलूदार बरे,
आणि कोंदण, जरा कमी रेखीवच बरे!!
संसारात पण....
बायका कोंदण, आणि नवरे हिरे..
हिरे, पैलूदार, तेजस्वी, जणू तारे..
कोंदण, स्वत:च्या उरात, बिनबोभाटपणे,
दुसर्याचे अस्तित्त्व, खुपसून घेणारे...
बावळट,पारंपारिक कोंदणात, हिरा शोभतो तेजस..
हिरा गळला की, कोंदण, अर्थहीन, भकास.....
की हिर्याला कोंदण, तोलामोलाचे, वगैरे..
हिरे, जास्तीत जास्त पैलूदार बरे,
आणि कोंदण, जरा कमी रेखीवच बरे!!
संसारात पण....
बायका कोंदण, आणि नवरे हिरे..
हिरे, पैलूदार, तेजस्वी, जणू तारे..
कोंदण, स्वत:च्या उरात, बिनबोभाटपणे,
दुसर्याचे अस्तित्त्व, खुपसून घेणारे...
बावळट,पारंपारिक कोंदणात, हिरा शोभतो तेजस..
हिरा गळला की, कोंदण, अर्थहीन, भकास.....