कावळेदादा..
रविवारच्या सुटीचा घोळ फारच बाई,
उशिरा उठणी,पेपर,खाणी,काही आवरतच नाही..
बारानंतर होऊन गेली स्वैपाकाची घाई,
एकीकडे भाजी-आमटी,एकीकडे कुकरची शिट्टी..
एक पोळी तव्यावरती,एक पोळपाटावरती,
तेवढ्यात वाजली खर्रर्कन् दारावरची घंटी..
स्वैपाक सोडून आता कोण दार उघडेल बाई?
टीव्ही सोडून उठायला कोणी तयार नाही..
तेवढ्यात वाजली बेल वाजली परत-परत,
दार उघडायला मग गेले धावत-पळत..
दारात उभा होता माझा दोस्त कावळेदादा,
रोड दिसला थोडा, थोडा होता उदासवाणा..
रुसलास का रे कावळेभाऊ? हल्ली येत नाहीस,
तिरपी मान करुन माझ्याकडे पोळी मागत नाहीस..
बाळे माझी जेवता-जेवता तुझ्याशी गप्पा मारत,
एक घास चिऊताईला,एक तुलाही देत..
हो ग ताई,काय सांगू,आमची अडचण बाई?
घरटं करायला,सावलीला,आम्हांला झाडच उरलं नाही..
सोसायटीत,रस्त्यांवर बघ,झाड नाही कुठेच,
जातो मग जंगलाकडे,राहतो झालं तिथेच!!..
निसर्गप्रेमी आहेस ना? मग प्लीज एवढं कर,
बाल्कनीत, खिडकीत, गच्चीत,दोन तरी झाडं लाव..
रोज येईन मग इथे,बाळघास खाईन,
उडेन,फिरेन,मान उडवेन,तुझ्या बाळाला खेळवेन..
वचन देते कावळेदादा,नक्की करीन एवढं,
माझ्याबरोबर शेजारणीही लावतील दोन-दोन झाडं..
बघता-बघता सोसायटी,गाव होईल हिरवंगार,
मग माझा कावळेदादा उदास नाही राहणार......