उखाणा..
केळीची कमान दारावर,
सनई-चौघड्याचा गजर..
कोमल अंगावर हळद ओली,
मोत्यांची मुंडावळ हळूच झुलली..
अबोलीची वेणी,जुईचा गजरा,
थोरा-मोठ्यांच्या कौतुकाच्या नजरा..
सावधानच्या इशार्याबरोबर अक्षतांचा वर्षाव,
कुंकवावरती सुधाकरांचे नाव..
सहजीवनाची सुरेल सुरुवात,
सुधाकरांच्या दीपात,सुषमा फुलवात....
सनई-चौघड्याचा गजर..
कोमल अंगावर हळद ओली,
मोत्यांची मुंडावळ हळूच झुलली..
अबोलीची वेणी,जुईचा गजरा,
थोरा-मोठ्यांच्या कौतुकाच्या नजरा..
सावधानच्या इशार्याबरोबर अक्षतांचा वर्षाव,
कुंकवावरती सुधाकरांचे नाव..
सहजीवनाची सुरेल सुरुवात,
सुधाकरांच्या दीपात,सुषमा फुलवात....